सोयाबीनला हमीभाव मिळवा; मोबाईल वरून अशी करा नोंदणी..!

Soybean Registration : खुल्या बाजारात सध्या सोयाबीनचे भाव घसरले असल्याने अनेक शेतकरी आता सरकारी हमीभावाचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत. यासाठी नाफेडकडून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून शेतकरी स्वतः ई-समृद्धी मोबाईल अॅपच्या माध्यमातून सहज नोंदणी करू शकतात. तर चला, ही नोंदणी कशी करायची ते पाहूया.

सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून ‘ई-समृद्धी’ अॅप डाउनलोड करा आणि ते उघडा. अॅप सुरू करताच मोबाईल क्रमांक टाकून ओटीपीच्या मदतीने लॉगिन प्रक्रिया पूर्ण करा. लॉगिन झाल्यावर आधारकार्डवरील पूर्ण नाव आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन केल्यावर तुमची वैयक्तिक माहिती सिस्टममध्ये आपोआप भरली जाईल. पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला आवश्यक त्या सर्व तपशीलांची नोंद करावी लागणार आहे.

यानंतर अर्जामध्ये शेतकऱ्याचं पूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, जमिनीचा प्रकार (अल्पभूधारक असल्यास त्याचा उल्लेख), प्रवर्ग आणि वडिलांचे नाव अशी माहिती भरावी लागते. ओळख पडताळणीसाठी आधार कार्डचा JPEG फोटोही अपलोड करावा लागतो, मात्र तो 10 MB पेक्षा कमी आकाराचा असावा. ही सर्व माहिती सबमिट केल्यानंतर तुमचे प्राथमिक रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचा पॉपअप तसेच एसएमएस तुमच्या मोबाईलवर येईल. त्यानंतर ‘बँक डिटेल’ या ऑप्शनवर क्लिक करून बँकेची माहिती अचूकपणे नोंदवा.

आता यात खातेदाराचे नाव, बँकेचा IFSC कोड यांसह सर्व माहिती अचूक भरावी लागते. त्यासोबत पासबुकचा JPEG फोटो देखील अपलोड करावा, मात्र त्याचा आकार 10 MB पेक्षा अधिक नसावा. बँक तपशील योग्यरीतीने भरून झाल्यानंतर पुढील पाऊल म्हणजे योजना निवडणे. तुम्ही सोयाबीनसाठी नोंदणी करत असल्याने सोयाबीनविषयक योजना निवडावी लागते. हीच प्रक्रिया त्या संपूर्ण रजिस्ट्रेशनमधील अंतिम आणि अत्यंत महत्त्वाची स्टेप ठरते.

आता या मध्ये सर्वप्रथम जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर आणि खात्याचा क्रमांक अशी माहिती भरावी लागते. यानंतर महत्त्वाचे दस्तावेज — म्हणजे सातबारा उतारा स्कॅन करून अपलोड करावा लागतो. सातबारा सबमिट होताच तुमचे नाफेडमधील रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल. अशा प्रकारे काही सोप्या स्टेप्स पूर्ण करून शेतकरी सहजपणे नाफेडकडे सोयाबीनची नोंदणी करू शकतात.

Leave a Comment

Join WhatsApp Group