फक्त 7 लाखात म्हाडाचे घर; लॉटरीविना मिळेल घर, असा करा अर्ज..!

Mhada Flats : म्हाडा योजना म्हणजे सामान्य नागरिकांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करणारी सर्वात महत्त्वाची आणि खास गृह योजना (Housing Scheme). या योजनेच्या माध्यमातून स्वस्त घरांची लॉटरी काढली जाते. त्यामुळे अनेकजण या लॉटरीची वाट पाहतात. विशेष म्हणजे मुंबई पुण्यातील लोक म्हाडाची लॉटरी कधी निघते यावर लक्ष ठेवून असतात. म्हाडा वारंवार लॉटरी काढून सामान्यांना घर घेण्याची संधी उपलब्ध करून देते. आता सुद्धा एक खास संधी उपलब्ध झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही घरे लॉटरीशिवाय घेता येणार आहे. त्यापेक्षाही खास म्हणजे या घरांची किंमत फक्त सात लाखांपासून आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर फक्त 7 लाख रुपयांत म्हाडाचे घर घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. जाणून घेऊया संपूर्ण माहिती..

म्हाडाच्या पुणे मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे, सांगली आणि सोलापूर येथील काही घरे दोनपेक्षा अधिक वेळा लॉटरी काढून देखील विकली गेली नव्हती. त्यामुळे आता ही घरे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर थेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. यासाठीची अधिकृत जाहिरात शुक्रवारी प्रसिद्ध झाली असून, इच्छुकांना लॉटरीशिवाय थेट अर्ज करून घर घेण्याची संधी मिळणार आहे. या घरांच्या किंमती केवळ 7 लाखांपासून 15 लाख रुपयांपर्यंत आहेत. म्हणजेच स्वस्त दरात स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची ही उत्तम वेळ.

म्हाडाच्या काही प्रकल्पांमध्ये अर्जदारांकडून कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे अनेक घरे रिक्त पडलेली आहेत. उच्च दर आणि इतर काही कारणांमुळे अनेक वेळा सोडती घेऊनही ही घरे विकली गेली नाहीत. त्यामुळे अखेर म्हाडाने नवा निर्णय घेतला आहे. आता विविध मंडळातील ही घरे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर थेट विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. म्हणजेच, लॉटरीची वाट न पाहता थेट घर खरेदीची ही सुवर्णसंधी.

असा करा अर्ज

या निर्णयानुसार म्हाडाच्या पुणे मंडळाने पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतील एकूण 311 रिक्त घरांच्या थेट विक्रीसाठी जाहिरात जाहीर केली आहे. यात पुण्यातील म्हाळुंगे, शिरूर आणि चाकण येथील, सोलापूरच्या करमाळा येथील तसेच सांगलीच्या मिरज भागातील घरे समाविष्ट आहेत. इच्छुक नागरिकांना अर्ज म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ‘बुक माय होम’ या वेबसाईटवरून सादर करता येतील. तसेच, पुणे मंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन देखील अर्ज भरता येणार आहेत. विशेष म्हणजे, या घरांसाठी सोडतीची आवश्यकता नाही, मात्र पात्रतेसाठी म्हाडाच्या काही अटी लागू राहणार आहेत.

म्हाडाची ही घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असल्याने अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये. या घरांच्या विक्रीसाठी सामाजिक आरक्षणाचा नियम लागू राहणार असून, घरे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या-विमुक्त जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्ग या गटांतील नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. मात्र, पत्रकार, कलाकार आणि इतर विशेष प्रवर्गांना या योजनेत आरक्षण देण्यात आलेले नाही.

म्हाडाच्या या योजनेअंतर्गत घरांच्या किंमती स्थानानुसार वेगळ्या ठरवल्या आहेत. चाकण–म्हाळुंगे भागातील घरांची किंमत 13 लाख 61 हजार, शिरूरमधील घरांची किंमत 14 लाख 72 हजार आणि 15 लाख 1 हजार, तर चाकणमधील काही घरे केवळ 11 लाख 50 हजार आणि 6 लाख 95 हजार या किंमतीत उपलब्ध आहे. सोलापूरच्या करमाळा येथील घरांची किंमत 7 लाख 25 हजार, मिरजमधील घरांची किंमत 13 लाख 43 हजार आणि 15 लाख 8 हजार, तर सांगली–कर्नाळा रोडवरील घरे 8 लाख 95 हजार इतक्या परवडणाऱ्या दरात दिली जाणार आहेत.

39 thoughts on “फक्त 7 लाखात म्हाडाचे घर; लॉटरीविना मिळेल घर, असा करा अर्ज..!”

    • ही योजना मुंबई मध्ये आणली असती तर बरं झालं असतं माझ्या सारख्या अनेक गरजूंना घर मिळालं असतं.

      Reply
  1. सोबत घरे शिल्लक असलेल्या ठिकाणाचे नां, जाहिरात, किंमत पाठविणे गरजेचे आहे.
    मोघम सात लाखात घरे आहेत ही जाहिरात नको.

    Reply
  2. चाकण परिसरात जर सोईस्कर ठिकाणी
    साईड असेल तर मी फ्लॅट घेईल.

    Reply

Leave a Comment

Join WhatsApp Group