Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत ऑक्टोबर 2025 महिन्याचा हप्ता जारी करण्यास मंजुरी दिली आहे. आता या योजनेचा निधी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. चला, यासंदर्भातील शासन निर्णय (GR) आणि महत्वाची माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया.
ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मंजूर – 410 कोटी रुपयांचा निधी जारी
29 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) काढला आहे.
या GR नुसार, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या ऑक्टोबर 2025 च्या हप्त्यासाठी एकूण ₹410 कोटी 30 लाख रुपये इतका मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. म्हणजेच — हा निधी आता खात्यात जमा करण्यासाठी अधिकृतपणे मंजूर झाला आहे. काही दिवसांतच सर्व पात्र बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
पैसे कधी जमा होतील?
या योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे KYC पूर्ण असो वा नसो, तरीही पात्र लाभार्थ्यांना हप्ता मिळणार आहे.
 
					 
		